शहरातील रुग्णसंख्याही खालावल्याने, शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत होती.
संगमनेर ः नोव्हेंबरचा दुसरा पंधरवडा व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरासह तालुक्यातील कोविड रुग्णसंख्या वाढली आहे. रोज सरासरी 40 रुग्ण आढळत आहेत.
त्यातच शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. तालुक्यातील हा 46वा बळी आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
गेल्या महिन्याच्या सुरवातीला तालुक्यातील रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले होते.
शहरातील रुग्णसंख्याही खालावल्याने, शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत होती.
या काळात सलग पंधरा दिवस रोज सरासरी 38.27 या वेगाने रुग्णवाढ झाली. डिसेंबरच्या सुरवातीपासूनच रुग्णसंख्येने चाळिशी पार केली आहे.
तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या गुरुवारी पाच हजार 326, तर मृत्यूंची संख्या 46 झाली आहे. नागरिक मात्र नियम पाळताना दिसत नाहीत.