Sangamner Crime : जमावाकडून तीन जणांना मारहाण; पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल

विकास आहेर याच्या हाताला, पायाला व पाठीला मुकामार लागला आहे. याप्रकरणी विकास गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीवरुन लकी पान स्टॉल दुकानातील इसम व इतर पंधरा ते वीस अनोखळी व्यक्तींवर गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे.
Sangamner Crime
Sangamner Crime esakal
Updated on

संगमनेर : शहरातील दिल्लीनाका परिसरातील लकी पानटपरीजवळ तिघांना पान घेण्याच्या कारणातून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत एकासह अनोळखी पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com