
संगमनेर : संगमनेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. आज (ता. १९) झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कांदा, डाळिंब, भाजीपाला अशा साठवलेल्या आणि उभ्या पिकांचे नुकसान झाले. काही भागांत घरांची पडझड झाली. माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.