

Maize seeds distributed to farmers in Sangamner to promote green fodder production and prevent livestock fodder shortages.
esakal
संगमनेर,: संगमनेर तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पशुधन संगमनेर तालुक्यात असल्याने आगामी काळात जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण होणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पशुधनाला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी तालुका पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागामार्फत तालुक्यातील जवळपास साडेचार हजार शेतकऱ्यांना २२ टन मका बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक आयुक्त, तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रदीप खंडेराव यांनी दिली.