संगमनेर : धर्माच्या नावावरील राजकारण दुर्दैवी; थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धर्माच्या नावावरील राजकारण दुर्दैवी; थोरात

संगमनेर : धर्माच्या नावावरील राजकारण दुर्दैवी; थोरात

संगमनेर: समाजातील अघोरी परंपरेविरोधात सर्वप्रथम भगवान बुद्धांनी आवाज उठवला. अनेक संतांनी समतेच्या परंपरेचा प्रसार केला. या तत्वांना एकत्र आणण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. मात्र, सध्या देशात धर्माच्या नावावर राजकारण होत आहे हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तालुक्यातील वडगावपान येथे भीम प्रतिष्ठानतर्फे संविधान स्तंभाचे लोकार्पण व विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. वडगावपान - जोर्वे, काशीद वस्ती या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर निळवंडे कालव्यांसह तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे.

येथील सुसंस्कृत राजकारण, समाजकारण संपूर्ण राज्याला आदर्शवत आहे. दुर्गा तांबे, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, महेंद्र गोडगे, बेबी थोरात, बाळासाहेब गायकवाड, सरपंच श्रीनाथ थोरात, पद्मा थोरात, उपसरपंच सोमनाथ गायकवाड, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश थोरात, गौरव डोंगरे, बाळू गायकवाड, आदित्य गायकवाड, सागर गायकवाड, अन्वर तांबोळी उपस्थित होते.

संगमनेरची विकासाकडे सुरु आहे. राज्याच्या विविध भागातील लोक संगमनेर में जो सुकून है.. वो किधर भी नही असे अभिमानाने सांगतात, हा आपला गौरव आहे.

- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

Web Title: Sangamner Politics Name Religion Unfortunate Thorat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top