
संगमनेर : शहरात अवैध कत्तलखाने धाडसाने सुरू असताना, स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी शासनाला दिलेली माहिती खोटी, दिशाभूल करणारी आणि वस्तुस्थितीशी विसंगत आहे. आमदार अमोल खताळ यांनी ही गंभीर बाब विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करत, या प्रकरणात संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी आणि शहर पोलिस निरीक्षक यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे केली.