
अहिल्यानगर : शहरातील बेकायदा बांधकाम, अतिक्रमणे, तसेच निवासी बांगलादेशींवर कारवाईच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी आज महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. उपनगरांत अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिक, तसेच जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून अनधिकृतपणे अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत. जागा बळकाविण्याचे प्रकार त्यांच्याकडून सुरू आहेत. या लोकांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची मागणी जगताप यांनी केली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देखील देण्यात आले.