
अहिल्यानगर : कापड बाजारात जिल्हाभरातून ग्राहक खरेदीसाठी येतात. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. कापड बाजारातील व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करणाऱ्यावर पोलिसांनी जुजबी कारवाई केली. त्यामुळे लगेचच जामीन झाला आहे. मात्र, पुन्हा दहशतीची कृती केल्यास त्यांना धडा शिकवला जाईल, कापड बाजार हातगाडीमुक्त करू, असा गंभ्ाीर इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.