ती आई आहे म्हणुनि...रोहित पवारांच्या मातुःश्रींचा मतदारसंघात स्वच्छतेचा जागर

Sanitation campaign in Jamkhed as well as in Karjat
Sanitation campaign in Jamkhed as well as in Karjat

जामखेड : महाराष्ट्रातील युवा राजकारण्यांमध्ये सर्वाधिक लक्ष कोणाकडे असेल तर ते रोहित पवार यांच्याकडे. कर्जत-जामखेड या मतदार संघात प्रत्येक काम वैशिष्ट्यपूर्ण कसे होईल यासाठी त्यांचा कटाक्ष असतो. आमदार रोहित हे विधानसभेत दिसत असले तरी त्यांचे अवघं कुटुंबच मतदारसंघाच्या विकासकामांत रमलं आहे. विशेषतः त्यांच्या आईसाहेब म्हणजेच सुनंदाताई यांचे बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष आहे.

मतदारसंघात पाणलोटविकास असेल नाही तर महिला सक्षमीकरण यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आता त्यांनी कर्जत-जामखेडच्या सुंदरतेकडे लक्ष वेधले आहे.

आपलं शहर स्वच्छ व सुंदर व्हावं आपल आरोग्य चांगल राहवं  याकरिता 'स्वच्छ सर्वेक्षण अभियान' च्या निमित्ताने  कर्जत-जामखेड ही दोन्ही शहरे दुर्गंधीच्या विळख्यातून मुक्त होऊन अव्वल स्थानी यावेत याकरिता आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री, अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत पाठोपाठ जामखेड शहरातही कामाला सुरूवात केली आहे.

येथील प्रभागनिहाय बैठका घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. या अभियानात विविध संघटना, व्यापारी, डॉक्टर संघटना व अन्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी एकत्र येऊन आपले योगदान द्यावे," असे आवाहन सुनंदाताई पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज जामखेड येथे केले.

दरम्यान, आमदार पवार हे जामखेड व कर्जत या दोन्ही तालुक्यांमध्ये महत्वकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे वडील अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार हे दोन्ही तालुक्यातील शेतीची उत्पादकता वाढावी व शेतकऱ्यांना अधिकचे आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता प्रयत्न करीत आहेत.

दुसरीकडे आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदाताई पवार मतदारसंघातील कर्जत नगरपंचायत व जामखेड नगरपालिकेचे कार्यक्षेत्र असणारी ही दोन्ही शहर स्वच्छ व्हावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत.

पहिल्या टप्प्यात दोन्ही शहरातून वाहणाऱ्या नद्या स्वच्छ करण्याचे काम त्यांच्याच पुढाकारातून झालं. नदीकडेला असलेल्या झाडाझुडपांचे अतिक्रमण व साचलेला गाळ हे सर्व काढून नदीच रूप  पालटलं. या नद्या वाहत्या झाल्या आणि शहरालगत साचलेले दुर्गंधीचे साम्राज्य पूर्णपणे वाहून गेले.

आता शहराच्या मध्यवर्ती असलेले अस्वच्छतेचे साम्राज्य समूळ नष्ट करण्यासाठी सुनंदाताई पवारांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेचे अभियान हाती घेतले आहे. याकरिता शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या प्रभागनिहाय बैठका घेऊन  या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी आज जामखेड येथील पत्रकार परिषदेत केले. एकप्रकारे त्यांनी नवरात्रौत्सवात स्वच्छतेचा जागर सुरू केला आहे.

एकंदरीत रोहित पवार यांच्या राजकीय यशात सुनंदाताई यांचे योगदान मोठे आहे. आमदार पवार हेही ते मान्य करतात. म्हणूनच त्यांनी विधानसभेत शपथ घेताना आपल्या आईच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला. त्यावेळी अवघ्या महाराष्ट्राने त्यांचे कौतुक केलं होतं.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com