
शिर्डी : बीड येथील संतोष देशमुख हत्याकांडात ज्यांचा सहभाग आहे, त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. या प्रकरणाशी संबंधित कोणीही असो, कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई होणारच.