सरपंचाने ठरवलं तर गावाचं काय होऊ शकते; बाराशे लोकसंख्या असलेल्या वाघुंडे खुर्दची स्टोरी वाचाच

मार्तंड बुचुडे 
Tuesday, 1 September 2020

नगर- पुणे महामार्गावर अवघ्या बाराशे लोकसंख्या असलेल्या वाघुंडे खुर्द गावात सरपंच संदीप मगर यांनी सुमारे 45 लाख रूपये खर्च करून ग्रामपंचायतसाठी ग्रामसंसद नावाची एक आदर्श वास्तू उभी केली आहे.

पारनेर (अहमदनगर) : नगर- पुणे महामार्गावर अवघ्या बाराशे लोकसंख्या असलेल्या वाघुंडे खुर्द गावात सरपंच संदीप मगर यांनी सुमारे 45 लाख रूपये खर्च करून ग्रामपंचायतसाठी ग्रामसंसद नावाची एक आदर्श वास्तू उभी केली आहे. गावात पाच वर्षात त्यांनी सुमारे तीन कोटीहून अधिक रुपयांची विकास कामे करून गावाचा कायापालट केला आहे. गावाला आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणले आहे. 

वाघुंडे खुर्द अतीशय छोटे खेडे गाव आहे. पाच वर्षात विविध मार्गाने गावासाठी सुमारे तीन कोटी रूपयांपेक्षा अधिक रूपयांचा विकास निधी मगर यांनी आणून गावाचा कायापालट केला. नुकतीच ग्रापंचायतीसाठी एक आदर्श अशी ग्रामसंसदची इमारत उभी केली आहे. त्यात व्यापारी गाळे तसेच ग्रामस्थांसाठी शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभा केला आहे. सहा लाख रूपये खर्च करूण अवघ्या पाच रूपयात ग्रामस्थांना शुद्ध साधे व थंड पाणी येथे मिळणार आहे.

गावातील व सर्व वस्त्यांवरील रस्ते पक्के केले असून गावात व वस्त्यांवर एकूण 80 वीजेचे खांब उभे करूण सर्त्र स्ट्रीट लाईटची सोय केली आहे. गावात आदर्श अंगणवाडी १३ लाख रूपये खर्च करून जिल्हा परीषद शाळेची सुंदर इमारत उभी केली आहे. गावात खाजगी सुरू असलेले विना अनुदानित व तीनशे विद्यार्थी शिकत असलेले माध्यमिक विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर असलेले ग्रामस्थांच्या मदतीने ताब्यात घेऊन 60 लाख रूपयांची इमारत बांधून विद्यालयास अनुदानही मिळवून दिले आहे. विद्यालयातील सर्व वर्ग डिजीटल केले आहेत.

स्मशानभूमी, दत्तमंदीर परीसर व गावाठाणात अनेक ठिकाणी सुशोभिकरण तसेच वृक्षारोपण करूण परीसर सुंदर व रमनिय बनविला आहे. झाडांच्या सुरक्षेसाठी व लोकांना बसण्यासाठी झाडांभोवताली मोठ मोठे ओटे ही बांधले आहेत.गावातील दत्त मंदीर परीसराचा क वर्ग तीर्थ क्षेत्रातून विकास सुरू आहे. 

अतीशय सुंदर अशा ग्रामसंसदेचे उदघाटन अद्याप झाले नाही. या इमारतीत अद्यायावत ग्रामपंचायत कार्यालय तसेच सभागृह व संरपच ग्रामसेवक यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष केले आहेत. तसेच विविध कार्यक्रमांसाठी एक मोठा हॉलही बांधला आहे. मोठ्या शहराच्या कार्यलयासही लाजविल अशी ही ग्रामसंसदेची इमारत सरपंच मगर यांनी ऊभी केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch of Waghunde Khurd village in Parner taluka carried out development works worth Rs 3 crore in five years