
अहिल्यानगर : तालुक्यातील वाळुंज येथील सरपंच पुत्राला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मकरंद गोरखनाथ हिंगे (वय ४०, रा. वाळुंज, ता. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. या संदर्भात बांधकाम ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.