
अहिल्यानगर : बँकेमध्ये गहाण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी पैसे घेऊन रिक्षातून निघालेल्या दाम्पत्याकडील ८५ हजारांची रोकड चोरट्यांनी चोरली. सावेडी उपनगरातील स्टेट बँकच्या शाखेपासून ते दिल्लीगेट दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी शनिवारी तोफखाना पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.