
अहिल्यानगर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना बालभारतीकडून नव्याने पुस्तके मिळणार आहेत. आता पूर्वीप्रमाणेच प्रत्येक विषयाची स्वतंत्र पुस्तके दिली जाणार आहेत. बालभारतीकडे जिल्हा परिषदेने त्यासाठीची मागणी नोंदवली आहे. या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे पुन्हा वाढणार आहे.