esakal | पहिले सत्र संपत आले तरी शाळा बंदच; पालकांना चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

The school is closed even though the first session is over

प्रथम सत्र संपत आले तरीही नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाले नाही. अद्याप शाळा सुरू न झाल्याने व लवकर होतील अशी शक्यता नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत.

पहिले सत्र संपत आले तरी शाळा बंदच; पालकांना चिंता

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : प्रथम सत्र संपत आले तरीही नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाले नाही. अद्याप शाळा सुरू न झाल्याने व लवकर होतील अशी शक्यता नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. मुलांच्या अभ्यासक्रमाचे काय, वर्ष तर वाया जाणार नाही अशी चिंता पालकांना लागली आहे. तालुक्यात बहुतेक ठिकाणी ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. प्राथमिक विभागातील अवघी 514 मुले किमान कोगदोपत्री तरी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित दिसत आहेत. अर्थात प्रत्यक्षात मुलांच्या पदरात किती व काय पडत आहे हे मात्र सांगणे कठीण आहे.

कोरोना महामारीमुळे गेली सहा महिण्यांपासून शाळा बंद आहेत. गतवर्षी अनेक शाळांमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्याने शाळांना परीक्षा घेणे शक्य झाले नाही. जून मध्ये नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाले मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाला नसल्याने शाळा सुरू करता आल्या नाहीत. पालकांबरोबरच सरकारलाही अद्यापही शाळा कधी सुरू होतील याचा अंदाज नाही. आजाराचा प्रभाव कधी कमी होणार व शाळा कधी सुरू होणार हे मात्र अता सांगणे कठीण आहे. तसेच शाळा सुरू झाल्या तरी अशा कोरोनाच्या महामारीत पालकही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचा धोका स्वीकारतील का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रथम सत्र मुलांचे घरीच जाणार हे निश्चित आहे.

दुस-या सत्रात शाळा सुरू झाल्या तर अभ्याक्रमाचे काय असा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शिक्षण विभागाने 25 टक्के अभ्यासक्रम या पुर्वीच कमी केला आहे. मात्र अता पुन्हा अभ्यास कमी करावा लागेल. तसेच शैक्षणिक वर्षात सुद्धा बदल करावा लागेल अशी शक्यता दिसत आहे.

दिपावली नंतर शाळा सुरू झाल्या तर अभ्यासक्रम कमी करूण मुलांचे वर्षा वाया जाणार नाही अशी व्यवस्था शिक्षण विभागाने करावी अशी पालकांची इच्छा आहे. येणा-या काळात सुट्या कमी करूण शालेय कमकाजाचे दिवस भरून काढता येणार आहेत.

दरवर्षी मार्च एप्रील मध्ये सुरू होणा-या 10 व 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलून त्या मे जून मध्ये घेता येतील नंतर खालच्या इयत्तांच्या परीक्षा घेतल्या तरी चालतील. तसेच उन्हाळा व इतर सुट्या कमी केल्या तर पुढील शैक्षणिक वर्ष पुन्हा जुलै मध्ये सुरू करता येणार आहे.

तालुक्यातील बहुतेक प्राथामिक शाळांमध्ये जून जुलै पासूनच ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. त्या साठी काही ठिकाणी शिक्षकांनी व्हॉटसअपचा तर काही ठिकाणी स्वताःचे अॅप विकशीत करूण अभ्यास सुरू केला आहे. त्यातच आमदार निलेश लंके यांच्या निलेश लंके प्रतिष्ठाण मार्फतही ऑनलाईन अभ्यासाचे सॉफ्टवेअर विकशीत केले आहे त्यामार्फत ही अभ्यास सुरू आहे. 

जिल्हापरीषद प्राथमिक शाळेचा एकूण पट14हजार644 असून ऑनलाईन, झूम व गुगलद्वारे एक हजार21 तर व्हॉटसअपद्वारे आठ हजार 850 फोनद्वारे तीन हजार ऩऊशे 35 तर 87 विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकत आहेत. फक्त 514 मुले शिक्षणापासून वंछीत आहेत. आमच्या सर्वेत फक्त एक हजार 847 मुले मोबाईल नसलेली आढळून आली आहेत.
- बाळासाहेब बुगे, गटशिक्षण अधिकारी 


संपादन : अशोक मुरुमकर

loading image