
अकोले : गेल्या आठवड्याभरापासून अकोले तालुक्यातील बहुतांशी शाळांमध्ये शालेय पोषण आहार न मिळाल्याने ही मुले पोषण आहारापासून वंचित राहिली आहेत, तर या आदिवासी भागात कुपोषणाचे संकटाची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक आरोग्य वाढीवर त्याचा परिणाम होत असल्याने शासनाने विद्यार्थ्यांना ताबडतोब शालेय पोषण आहार उपलब्ध करावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.