वीजबिल कमी करायचे असेल तर "असा' पाठवा मीटर रीडिंगचा फोटो

अमित आवारी
Friday, 21 August 2020

महावितरणच्या अहमदनगर मंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या सर्व व वीज मीटरचे रिडींग घेणे कुठल्याही कारणास्तव शक्य न झाल्यास अशा ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर 'एसएमएस' द्वारे सूचित केले जात आहे.

नगर : महावितरणच्या अहमदनगर मंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या सर्व व वीज मीटरचे रिडींग घेणे कुठल्याही कारणास्तव शक्य न झाल्यास अशा ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर 'एसएमएस' द्वारे सूचित केले जात आहे.  

या ग्राहकांनी त्यांच्या मीटर रीडिंगचे फोटो मोबाईल अँपच्या माध्यमातून स्वतः सबमिट करावेत, ज्या ग्राहकांचे मोबाईल क्रमांक नोंदणी कृत नसेल असे ग्राहक सुद्धा महावितरण मोबाईल अँपद्वारे गेस्ट म्हणून वीज मीटरचे रिडिंग व फोटो पाठवु शकतात.  यातून परिमंडळात या महिन्यात आतापर्यंत 10 हजार 886 ग्राहकांनी मीटर रीडिंग फोटो महावितरण अँपच्या माध्यमातून पाठविले आहेत.

महावितरणच्या ग्राहकांना दरमहा वापरलेल्या विजेचे देयक देण्यात येते. हे देयक त्याच्या वीज मीटरवर असलेल्या रिंडींगच्या आधारावर देण्यात येत असते. त्यामुळे मीटर रिडींग अचूक प्राप्त झाल्यास देयक सुद्धा अचूकचं असते. मात्र कुठल्याही कारणास्तव रिडींग प्राप्त झाले नाही, वा सदोष असले तर देयक सुद्धा सरासरी वापरानुसार असू शकते. 
महावितरणच्या मोबाईल अँपव्दारे ग्राहक घरबसल्या आता आपले मीटर रिडींग पाठवू शकतात.

रिडींगनुसारच देयक प्राप्त करू शकतात. ज्या ग्राहकांचे मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदलेले आहेत त्यांना रिडींग सबमिट करण्यासाठी संदेश मिळाल्यापासून पाच दिवसांत रिडींग पाठवू शकतात. ज्या ग्राहकांचे मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदणी झालेले नसतील त्यांना मेसेज पाठविला जाणार नाही. त्यांनी आपल्या मागील महिन्याच्या किंवा जुन्या बिलावरील सुरु महिन्याचे रिडींग तारीख बघावी म्हणजे त्या तारखेच्या किमान एक दिवस आधीपासून असे पाच दिवसात रिडींग सबमिट करू शकतात. यासाठी ग्राहकास 12 अंकी ग्राहक क्रमांक आवश्यक आहे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Send a photo of the meter reading to get the electricity bill right