esakal | ऊसतोडणी कामगारांच्या संपावर निघणार मंगळवारी तोडगा
sakal

बोलून बातमी शोधा

A settlement will be reached on Tuesday on the strike of sugarcane workers

साखर संघाचे अध्यक्ष, संचालक व राज्यातील सुमारे सात ऊस,तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकींना अमंत्रित केले आहे. बैठकीत ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात किती वाढ होते याकडे लक्ष लागले आहे. 

ऊसतोडणी कामगारांच्या संपावर निघणार मंगळवारी तोडगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : ऊसतोडणी काढण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत (ता. 27) मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इस्टीट्युट येथे बैठकीचे आयोजन केले आहे.

साखर संघाचे अध्यक्ष, संचालक व राज्यातील सुमारे सात ऊस,तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकींना अमंत्रित केले आहे. बैठकीत ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात किती वाढ होते याकडे लक्ष लागले आहे. 

राज्यातील ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दराचा करार संपल्याने नव्याने करार करुन दरात साधारण दुप्पट वाढकरावी अशी मागणी करत ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. एखादा अपवाद वगळता संपामुळे यंदा अजूनही कामगार कारखान्यावर गेलेले नाहीत. त्यातच ऊसाचे क्षेत्र यंदा अधिक असल्याने कारखान्याचा गाळप हंगाम लांबण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

संप सुरु असल्याने अनेक कारखाने सुरु झाले नाहीत आणि चाररूबैठका होऊनही संपावर तोडगा निघाला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत होती. त्यानुसार आता मंगळवारी (ता. 27) मांजरी वसंतदादा शुगर इस्टीट्युट येथे बैठकीचे आयोजन केले आहे.

साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, मागील वेळी द्विसदस्यीय लवादच्या सदस्य माजीमंत्री पंकजा पालवे व मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्यातील सात ऊसतोडणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला हजर असतील. संपाबाबत पवार यांच्या मध्यस्थीने काय निर्णय होणार, मजुरांना किती दरवाढ मिळणार याकडे कामगारांसह साखर कारखानदारांचे लक्ष लागले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर