बनावट समजून फेकला अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार 

संजय काटे
Sunday, 26 July 2020

तालुक्‍यातील हिरडगाव येथील भुजबळ वस्तीवरील भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरावर रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घरफोडी चोरी झाली.

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यातील हिरडगाव येथील भुजबळ वस्तीवरील भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरावर रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घरफोडी चोरी झाली. घरातील सुमारे 13 तोळे सोने व दोन लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 

चोरी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांत काही बेन्टेक्‍स बांगड्या होत्या. त्याबरोबर दोन तोळ्याचा एक सोन्याचा हार होता. परंतु तो फिकट पिवळा असल्यामुळे तो हार बनावट समजून बेन्टेक्‍सच्या बांगड्याबरोबर चोरांनी शिवाजी भुजबळ यांच्या वीट भट्टी जवळ फेकून दिला. 

या चोरीबाबत श्रीगोंदे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कळविले असता पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी करून श्वान पथकास पाचारण केले. दरम्याननगर येथून श्वानपथक आले. पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी घटनास्थळी भेट दिली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven lakh rupee Burglary at Hirdgaon in Shrigonda taluka