अॉडिओ क्लिप भोवली, सात कर्मचारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

अपर पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांनी अवैध धंद्यावरील कारवाईसाठी विशेष पोलिस पथक नेमले होते. या पथकातील कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कुचराई करणे, पोलिस खात्याला अशोभनीय वर्तणूक केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

नगर : अपर पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षकांसह सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. 

पोलिस उपनिरीक्षक एस. एच. सूर्यवंशी, पोलिस कर्मचारी भरत डंगोरे, गणेश डहाळे, राजाराम शेंडगे, अजित घुले, विनोद पवार, अरविंद भिंगारदिवे, संदीप धामणे यांचा त्यात समावेश आहे. गुटखा व ऑडिओ क्‍लिप प्रकरणामध्ये दोन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. "ऑडिओ' क्‍लिप प्रकरणाची चौकशी करून पोलिस अधीक्षकांनी तो अहवाल विशेष पोलिस निरीक्षकांना पाठविला.

अपर पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांनी अवैध धंद्यावरील कारवाईसाठी विशेष पोलिस पथक नेमले होते. या पथकातील कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कुचराई करणे, पोलिस खात्याला अशोभनीय वर्तणूक केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अहमदनगर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven police officers suspended after audio clip went viral