shaneshwar devasthan trust bhojnalaya
sakal
सोनई - तब्बल एक वर्षापासून बंद असलेल्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या भोजनालयाची साडेसाती अखेर हटली. नूतनीकरणाचे काम, टेंडर प्रक्रिया व स्वयंपाकगृह व इतर सर्व सुविधांची स्वच्छता पूर्ण झाल्याने आज (ता. १) भाविकांना अल्पदरात जेवणाचे ताट हातात पडणार आहे. याकरिता प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे.