
सोनई : निळे जरदारी पितांबर, सोन्याचा मुकुट, सोन्यात मढलेली रुद्राक्षाची माळ, नवरत्न आणि मोत्याचा हार, तसेच विविध अलंकार व सूर्य पदकासह साज, शृंगार घालून आज जन्मोत्सवाच्या निमित्ताने शनिमूर्तीचे रुपडे भाविकांना भावणारे ठरले. मध्यान आरती सोहळ्यात मंगल वाद्य, सूर्यपूत्र शनिदेव की जय असा जयघोष आणि फुलांच्या वर्षावात चौथऱ्यावरील मूर्ती ‘रुप पाहता लोचनी’ प्रमाणे आत्मिक आनंद देणारी ठरली. आज दिवसभरात दोन लाख भाविकांनी भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला.