
-सतीश वैजापूरकर
शिर्डी : वयाची सत्तरी पार केलेल्या प्रसिद्ध तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांनी काल महिलादिनानिमित्त ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’ या लावणीवर अप्रतिम नृत्य सादर केले. आपल्यातील कला आणि ऊर्जा पूर्वी इतकीच आहे. विपन्न अवस्था अन् जीवनातील चढ-उतारावर या कलेने मात केल्याचे दर्शन त्यांच्या या नृत्याने उपस्थितांना घडवीले.