श्रीरामपूर : कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे तंत्रज्ञान गेमचेंजर ठरणार असून, यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. एआयचा वापर करून ऊस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, पाण्याचा वापरही कमी झाला आहे. हे प्रयोग गेल्या तीन वर्षांत यशस्वी ठरले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले.