
अहिल्यानगर : दानशूर लोकांची मदत हे रयत शिक्षण संस्थेचे वैशिष्ट्य आहे. सामान्य लोकांच्या मदतीने ‘रयत’ची कामे सुरू आहेत. शून्यातून कामाची सुरूवात झाली, आज संस्थेच्या हजारो शाखा आहेत. कर्मवीरांनी ‘कमवा आणि शिका’ योजना काढली, त्यातून मोठे झालेले विद्यार्थी संस्थेच्या पाठीशी आहेत. रयतचा शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी रयत कायम प्रयत्नशील आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी लवकरच उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा रयतचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.