
सिद्धटेक : महाराष्ट्र या एकमेव प्रांताला दिव्य स्वरूपाची आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. ही परंपरा कायम राखून ती पुढे नेण्याचे आदर्शवत काम पाहून समाधान वाटते. अव्याहतपणे संतपरंपरेचे काम करणाऱ्या आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, अशा शब्दांत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) व त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव केला.