श्रीरामपूर : स्व. अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त व नूतन ज्युनिअर कॉलेज इमारतीच्या उद्घाटनाचा सोहळा बुधवारी (ता.११) सकाळी १०.३० वाजता विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलात होणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार अनेक वर्षांनंतर श्रीरामपूरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत.