Devotees Prepare for Sharadiya Navratri and Ghatasthapana in Ahilyanagar
esakal
अहिल्यानगर: आदिमायेच्या आराधनेचा आणि स्त्रीशक्तीच्या जागराचा उत्सव असणाऱ्या शारदीय नवरात्राला रविवारपासून (ता. ११) प्रारंभ होत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर घटस्थापनेने या चैतन्यदायी उत्सवाची सुरुवात होणार आहे. नवरात्रोत्सवासाठी शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये सज्जता झाली असून, घरोघरीदेखील घटस्थापनेच्या तयारीची लगबग सुरू आहे. घटस्थापनेसाठी रविवारी (ता. ११) पहाटे ४:५६ वाजेपासून दुपारी १:३५ वाजेपर्यंत मुहूर्त आहे. या वेळेत आपापल्या सोयीनुसार कधीही घटस्थापना करता येईल. साधारणपणे नवरात्र हे नऊ दिवसांचे असते.