
नगर तालुका : सीमेवरील सैनिक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून तसेच ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता ते भारतीय सीमांचे रक्षण करतात. पारेवाडी सारख्या छोट्याशा गावातून सुमारे ४० सैनिक सध्या देशसेवा करत आहेत. त्यांच्यामुळेच आपला भारतदेश सुरक्षित आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले.