
नगर तालुका : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले. शिवसेना पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत लवकरच खासदार नीलेश लंके यांच्या सोबत बैठक घेतली जाईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली.