esakal | कुख्यात गुंड पाप्या शेखचा पापाचा घडा भरला, पोलिसांवर केला होता हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Sheikh Papacha, a notorious goon, was jailed for three years

पाप्या शेख, विनोद जाधव व अन्य दोघे आणि दोन महिला पत्र्याच्या शेडजवळ उभे होते. पोलिसांना पाहून दोघे वेगवेगळ्या दिशांना पळाले. त्यांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत दोन कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, चॉपर, सुरा जप्त केला. 

कुख्यात गुंड पाप्या शेखचा पापाचा घडा भरला, पोलिसांवर केला होता हल्ला

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : शिर्डी येथील कुख्यात गुंड सलीम ख्वाजा शेख ऊर्फ पाप्या शेख व विनोद सुभाष जाधव यांना विविध गुन्ह्यांत आज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. नऊ वर्षांपूर्वी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. दोन्ही आरोपी सध्या अन्य गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. 

शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पाप्या शेख व त्याचा साथीदार विनोद जाधव यांचा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पुणे व नगर जिल्ह्यांत शोध घेत होते. पथकातील तत्कालीन पोलिस कर्मचारी राजेंद्र वाघ, भरत डंगोरे, संजय इस्सार हे शिक्रापूर येथे आरोपींचा शोध घेत होते. त्या वेळी हे आरोपी बेलवंडी फाटा येथे आल्याची माहिती तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक रजपूत यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 5 ऑगस्ट 2011 रोजी बेलवंडी फाटा येथे सापळा रचला.

पाप्या शेख, विनोद जाधव व अन्य दोघे आणि दोन महिला पत्र्याच्या शेडजवळ उभे होते. पोलिसांना पाहून दोघे वेगवेगळ्या दिशांना पळाले. त्यांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत दोन कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, चॉपर, सुरा जप्त केला. 

पोलिस कर्मचारी संजय इस्सार यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात, सरकारी कामात अडथळा, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. बेलवंडी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात झाली. श्रीगोंदे येथे जिल्हा सत्र न्यायालय झाल्यानंतर तेथे हा खटला वर्ग करण्यात आला.

खटल्यात सरकार पक्षातर्फे फिर्यादीसह पाच साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. मंगेश दिवाणे व जी. के. मुसळे यांनी बाजू मांडली. अहमदनगर 

संंपादन - अशोक निंबाळकर

loading image