
चोरांनी कपाटातील सामानाची उचकापाचक करून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, असा तीन लाख सहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
शेवगाव (अहमदनगर) : घरातील व्यक्ती लग्नसोहळ्यासाठी गेल्याची संधी साधून चोरांनी दुपारी घराचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तीन लाख सहा हजारांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी (ता. 8) दुपारी देवटाकळी येथे ही घटना घडली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
विजय शंकर खरड (रा.देवटाकळी) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की पत्नी व दोन मुलांसह शुक्रवारी नेवासे तालुक्यात नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी गेलो होतो. सायंकाळी घरी आलो तेव्हा घर उघडे होते. पोलिसांना तत्काळ माहिती दिली.
चोरांनी कपाटातील सामानाची उचकापाचक करून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, असा तीन लाख सहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.