Fodder Shortage: जनावरांना जगवायचे कसे ? शेतकऱ्यांचा सवाल : चारा छावण्यांची मागणी

Farmers Sell Livestock Amid Fodder Shortage : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. चारा आणि पाण्याची टंचाई वाढल्याने जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण झाले असून, अनेकांनी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली आहेत.
Farmers in Shevgaon are selling livestock as drought conditions worsen and fodder and water become scarce.

Farmers in Shevgaon are selling livestock as drought conditions worsen and fodder and water become scarce.

esakal

Updated on: 

उद्धव देशमुख

बोधेगाव, : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके हातची गेली आहेत. पावसाअभावी विहिरींची पाणीपातळी खालावली असून, हिरव्या चाऱ्याचे उत्पादनही ठप्प झाले आहे. एकीकडे शेतीत केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया गेला, तर दुसरीकडे जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Loading content, please wait...