Vidhan sabha Election 2024sakal
अहिल्यानगर
Shevgaon Assembly Election : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ‘त्रिमूर्तीं’कडेच लक्ष
Vidhan sabha Election 2024 : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मोनिका राजळे व प्रताप ढाकणे यांची उमेदवारी होण्याची शक्यता असुन मतदारसंख्याही मोठी असल्याने स्पर्धा चुरशीची असेल.
शेवगाव: शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपकडून आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ॲड. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय निवडणुकीच्या रिंगणात माजी आमदार चंद्रशेखर घुले, हर्षदा काकडे, गोकूळ दौंड, वंचित आघाडीचे प्रा. किसन चव्हाण, नितीन काकडे हे सुद्धा उतरणार असल्याने निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे.