
श्रीगोंदे : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. ही घटना रविवारी(ता.४) रात्री दहाच्या सुमारास शिक्रापूर-जामखेड महामार्गावर आढळगाव (ता. श्रीगोंदे) शिवारात घडली. रोहित भरत शिंदे (वय २२) व अतुल एकनाथ शिंदे (वय ३०, दोघेही रा. आढळगाव, ता. श्रीगोंदे) अशी मयतांची नावे आहेत. कारवाईच्या मागणीसाठी मृतांच्या नातेवाईकांनी सोमवारी (ता.५) सकाळी गाव बंद ठेवत रास्तारोको आंदोलन केले.