
या बैठकीत ग्रामपंचायत व सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मधुकर उचाळे यांनी ग्रामस्थासमोर मांडला असता ग्रामस्थांनीही बिनविरोध निवडीला एकमताने पाठिंबा दर्शविला.
निघोज ः राज्यात व जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीस प्रारंभ होत असताना पारनेर तालुक्यातील शिरापुर गावची ग्रामपंचायत व सेवा सोसायटीची निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याअगोदरच बिनविरोध करण्याचा निर्णय झाला.
जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंर्वधन समितीचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या बैठकीत ग्रामपंचायत व सेवा सोसायटीच्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सलग सहा वेळा गावातील ग्रामपंचायत व.सेवा सोसायटीची निवडणुक बिनविरोध करुन शिरापुर ग्रामस्थांनी राज्यात विक्रम केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा अन् गावाला पंचवीस लाखांचा निधी घ्या, असे जाहीर करुन पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला .त्यामुळे पारनेर तालुक्यात आज अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध निवडीच्या मार्गावर असताना जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंर्वधन समितीचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिरापूर येथे आज (सोमवारी) ग्रामस्थांची बैठक पार पडली.
या बैठकीत ग्रामपंचायत व सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मधुकर उचाळे यांनी ग्रामस्थासमोर मांडला असता ग्रामस्थांनीही बिनविरोध निवडीला एकमताने पाठिंबा दर्शविला.
ग्रामपंचायतसाठी बिनविरोध निवडीसाठी ठरलेले सदस्य -
रखमा बाबुराव उचाळे,हनुमंत शंकर भोसले, संतोष पांडुरंग नरसाळे ,अस्मिता मधुकर उचाळे, जान्हवी भास्कर उचाळे, जयश्री सोमनाथ वडणे, लीलाबाई पांडुरंग शिनारे, किरण सचिन खामकर ,कैलास पोपट उचाळे, ललिता नवनाथ चाटे. शिरापूर सेवा
सोसायटीसाठी बिनविरोध ठरलेले सदस्य
सचिन श्रीराम शिनारे, दत्तात्रय गेनभाऊ नरसाळे, गोविंद साहेबराव चाटे, संदीप तुकाराम खाडे, शिवाजी श्रीपती दाते, शहाजी नाथु उचाळे, संतोष तुकाराम गुंजाळ, मच्छिंन्द्र खंडू उचाळे, ज्ञानेश्वर रामदास साळवे, उषा मारुती गाडगे, सोमनाथ शंकर उचाळे, पांडुरंग रुमजी वडणे, संतोष दाते.