शिरसगावकरांची तहान भागणार, डिसेंबरअखेर पाणीयोजना कार्यान्वित

गौरव साळुंके
Saturday, 14 November 2020

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत विकास कार्य करीत आहे. गावाचा पाणीप्रश्न सोडण्यासाठी परिसरातील अशोक बांधाऱ्याचे खोलीकरणाचे काम ग्रामपंचायतने लोकसहभागातून केले.

श्रीरामपूर ः येथील शिरसगावसाठी 13 कोटी रुपयांचा निधी खर्च करुन जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या जलस्वराज दोन पाणी पुरवठा योजनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

डिसेंबरअखेर काम पूर्ण होणार आहे. नुकतेच पाण्याची टाकी, पाईप लाईन, नळ पाईपलाईनटी चाचणी पूर्ण झाली. पुढील दोन दिवसांत ग्रामस्थांना नळ जोडणी मिळणार असल्याची माहिती सरपंच आबासाहेब गवारे यांनी दिली. त्यामुळे शिरसगाव येथील नागरिकांना मीटरव्दारे शुद्ध पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांची समाधान व्यक्त केले आहे.

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत विकास कार्य करीत आहे. गावाचा पाणीप्रश्न सोडण्यासाठी परिसरातील अशोक बांधाऱ्याचे खोलीकरणाचे काम ग्रामपंचायतने लोकसहभागातून केले. उन्हाळ्यात पाणी टंचाई व दुषित पाण्यामुळे ग्रामस्थांना पाणी पुरवठाबाबत अनेक अडचणी येत होत्या.

समन्यायी कायदा व जल आराखड्यामुळे धरणाचे पाणी जायकवाडीला देण्याचे शासनाने ठरविल्यामुळे शिरसगावच नव्हे तर नगर जिल्हा दुष्काळग्रस्त होणार होता. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी शिरसगाव ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे पाणी पुरवठ्यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायतीने पाठपुरावा केल्याने शिरसगावसाठी जिल्हा परिषदेने जलस्वराज दोन पाणी पुरवठा योजना मंजूर केली. त्यामुळे शिरसगाव ग्रामस्थांना मीटरद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा केला जाणार आहे.

योजनेच्या कामाची गोरख गवारे, प्रकाश गवारे, दत्तात्रय गवारे, शिवाजी गवारे, विजू गवारे, भास्कर ताके यांनी आज पहाणी करुन कामांचा आढावा घेतला. शिरसगाव, इंदिरानगर परिसरात अनेक वर्षांनंतर स्वच्छ पाणी पुरवठा होणार असुन वाटर फिल्टर टेस्टिंग, पाण्याचे टाकी, पाईपलाईन चाचणी पूर्ण झाली आहे. पुढील दोन दिवसांत ग्रामस्थांना नळ जोडणी मिळणार असल्याची माहिती सरपंच आबासाहेब गवारे यांनी दिली.
अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirasgaonkar's water scheme will be operational by the end of December