Shirdi Constituency Lok Sabha Election Result : शिवसेना ठाकरे गटाने पेटवली मशाल; जनतेने भाऊसाहेब वाकचौरे यांना दिली दिल्लीत जाण्याची संधी

Shirdi Lok Sabha Election Result 2024 Shivsena UBT Bhausaheb Wakchaure win : कोपरगाव लोकसभा मतदारसंघाच्या विभाजनानंतर 2008 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. हा मतदारसंघाच्या निर्मितीपासून (2009 पासून) या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे.
Shirdi Constituency Lok Sabha Election Result
Shirdi Constituency Lok Sabha Election Result Esakal

शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मशाल पेटवली आहे. जनतेने भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा एकदा दिल्लीत जाण्याची संधी दिली आहे.

भाऊसाहेब वाकचौके - ४,७६,९००

सदाशिव लोखंडे- ४,२६,३७१

विजयी उमेदवाराचे मताधिक्य - ५०,५२९

मतदारसंघाच्या फेररचनेनंतर शिर्डी हा नवा लोकसभा मतदार संघ हा २००९ मध्ये स्थापन झाला व राखीव झाला. तेव्हा झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यानंतर वाकचौरे काँग्रेसवासी झाले व लोकसभा काँग्रेसकडून लढविली. मात्र सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव करून शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले. २०१९ च्या निवडणुकीवेळी राजकीय समिकरणे बदलली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपत आले. या निवडणुकीत लोखंडे पुन्हा शिवसेनेकडून विजयी झाले.

कोपरगाव लोकसभा मतदारसंघाच्या विभाजनानंतर 2008 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. हा मतदारसंघाच्या निर्मितीपासून (2009 पासून) या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. पण शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात यंदा 'शिवसेना' विरुद्ध 'शिवसेना' म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत झाली होती. 2014 मध्ये उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये परतले.

तर शिवसेना फुटीनंतर सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. भाऊसाहेब वाकचौरे विरूध्द सदाशिव लोखंडे असा सामना या निवडणुकीत झाला आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेनं याठिकाणी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा विजयही झाला होता. नंतर 2014 ला सदाशिव लोखंडेंना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली. पण त्यावेळी देखील लोखंडेंना विजय मिळाला.

Shirdi Constituency Lok Sabha Election Result
Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result : पुन्हा विखे की यावेळी लंके? कोणाला मिळणार दिल्लीत जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी?

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे (काँग्रेस), नेवासाचे आमदार शंकरराव गडाख (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), कोपरगावचे आमदार आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील(भाजप) - अकोल्याचे आमदार किरण लहामटे(अजित पवार गट), संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात (काँग्रेस)

Shirdi Constituency Lok Sabha Election Result
Chhatrapati Sambhajinagar Constituency Lok Sabha Election Result: तिरंगी लढतीनंतर इम्तियाज जलीलांना मिळणार पुन्हा संधी? की शिवसेनेच्या शिंदे-ठाकरेंचा उमेदवार मारणार बाजी?

शिर्डीत 62 टक्के मतदान

शिर्डी मतदारसंघात 62 टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते. लोकसभेच्या मतदानासाठी सकाळी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. मात्र दुपारच्या वेळी उन्हामुळे मतदानाचा वेग मंदावला होता. सायंकाळच्या वेळी अचानक मतदान केंद्रात गर्दी वाढल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते.

Shirdi Constituency Lok Sabha Election Result
Jalna Constituency Lok Sabha Election Result : जालन्यात रावसाहेब दानवे मारणार पुन्हा एकदा विजयाचा सिक्सर, की 'मविआ' घेणार विकेट?

२०१९ चे चित्र

खासदार सदाशिव लोखंडे (शिवसेना, विजयी) मतेः ४,८६,८२०

भाऊसाहेब कांबळे (कोग्रेस, पराभूत) मतेः ३,६६,६२५

संजय सुखदान (वंचित बहुजन आघाडी) मते : ६३,२८७

अॅड. बन्सी सातपुते - (सीपीआय) मते : २०,३००

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- १,२०,११५

Shirdi Constituency Lok Sabha Election Result
Beed Constituency Lok Sabha Election Result : पंकजा मुंडे की बजरंग सोनावणे, बीड लोकसभा मतदारसंघात कुणाची बाजी? पक्षफुटीची मदत की बसणार फटका?

वर्चस्व

२००४ :-

२००९ : शिवसेना

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

Shirdi Constituency Lok Sabha Election Result
Dharashiv Constituency Lok Sabha Election Result : धाराशिवमध्ये 'मशाल' पेटणार की अलार्म वाजणार? पुन्हा ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना संधी की अर्चना पाटील मारणार बाजी?

प्रभावी मुद्दे

शिर्डी ते नगर महामार्गाचे रखडलेले काम, निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम जलद गतीने करण्याचे आव्हान, गोदावरी कालव्यांचे नुतनीकरण, पश्चिमेचे पावसाचे पाणी पूर्वेला वळवून गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढणे, शिर्डीच्या विकासाचा मंदावलेला वेग

Shirdi Constituency Lok Sabha Election Result
Dharashiv Constituency Lok Sabha Election Result : धाराशिवमध्ये 'मशाल' पेटणार की अलार्म वाजणार? पुन्हा ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना संधी की अर्चना पाटील मारणार बाजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com