

अहिल्यानगर : शिर्डी येथे गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या चौकशीत चार गुन्हे उघड झाले असून, त्यांच्याकडून तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली.