
शिर्डी : साईदर्शनासाठी येणा-या प्रत्येक भाविकाचा पाच लाख रुपयांचा विमा साई संस्थानतर्फे उतरविण्यात येत आहे. त्यासाठी भाविकांनी येथील दर्शन अथवा निवास व्यवस्थेचे आॅनलाईन आरक्षण करणे गरजेचे आहे. आज गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून साई संस्थाने मुख्य कार्यकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही घोषणा केली.