
संगमनेर : येथील बसस्थानक परिसरात तिथीनुसार होणारी शिवजयंती साजरी करण्यासह छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची आरास उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून बुधवारी दुपारी बॅरिकेडिंग लावलेल्या जागेत दोन्ही गट समोरासमोर आले. यामुळे त्यांच्यात धक्काबुक्की झाली; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, अद्याप कुणालाच परवानगी देण्यात आलेली नाही.