Dilip Satpute Accident in Ahilyanagar: शिवसेनेचे दिलीप सातपुते यांच्या वाहनास अपघात; तलाठ्यांचा मृत्यु, वाहनाचा झाला चुराडा..
Dilip Satpute car accident : अपघातात सातपुते हे बचावले आहेत. तर त्यांचा चालक गंभीर जखमी झाला आहे. दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर : शिवसेनेचे (शिंदे गट) संपर्कप्रमुख दिलीप सातपुते यांच्या वाहनाचा शनिवारी (ता. १७) मध्यरात्री जामखेड रोडवरील सारोळा बद्दी शिवारात अपघात झाला. त्यात तलाठी महेंद्र काळे (रा. केडगाव) यांचा उपचार सुरू असताना मृत्यु झाला.