
अहिल्यानगर : राज्यात सध्या राजकीय चर्चा सुरू आहे, ती शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्या मोर्चाची. हे बंधू एकत्र येतील की नाही, याबाबत राजकीय धुरीण अटकळ बांधत आहेत. नगरमध्ये दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नेमके उलटे चित्र आहे. इतर लोकांना उत्सुकता असली, तरी संबंधित पक्षांत उदासीनता आहे.