Sonai News : नियतीनं हिरावले हात; तुम्ही द्या मदतीचा हात; वृत्तपत्रविक्रेते अपंग शिवाजी वाबळे यांची व्यथा

नशिबाची थट्टा म्हणून की काय, डावा हात नसलेल्या पाचेगाव येथील शिवाजी मच्छिंद्र वाबळे (वय-४५) यांचा पुन्हा अपघात झाला.
Shivaji Wable
Shivaji Wablesakal
Updated on

सोनई - पंधरा वर्षांपूर्वी अपघातात डावा हात निकामी झाला. परिस्थितीने संघर्ष शिकविल्याने तीन मुलींचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून एका हाताने पाचेगाव आणि पुनतगाव येथे वर्तमानपत्र घरोघर टाकून उपजीविका चालवायचे.

नशिबाची थट्टा म्हणून की काय, डावा हात नसलेल्या पाचेगाव येथील शिवाजी मच्छिंद्र वाबळे (वय-४५) यांचा पुन्हा अपघात झाला. यात उजवा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे पत्नी आणि तीन मुलींचा आधार रामभरोसे झाला.

शिवाजी वाबळे व मित्रमंडळी तीन दिवसांपूर्वी खासगी कारने जेजुरीच्या खंडोबाला जाताना वडाळा बहिरोबा येथे त्यांच्या वाहनास टेम्पोने धडक दिली. त्यात दोन मित्र ठार झाले, तर शिवाजी गंभीर जखमी झाले.

घरची परिस्थिती गरिबीची असल्याने अपंग पत्नी ज्योती, मुलगी ज्ञानेश्वरी, गायत्री व आरती खर्चाचा डोंगर पाहून चिंताग्रस्त झाल्या. शिवाजी यांना एकरभर जमीन. तीन मुलींचे शिक्षण होत नसल्याने त्यांनी पंधरा वर्षांपासून वर्तमानपत्राची एजन्सी घेऊन एका हाताने लुनावर दोन गावांत व वस्त्यांवर फिरून वर्तमानपत्र टाकत होते. वाचकांची गैरसोय होऊ नये म्हणून ते कुठेही बाहेरगावी जात नव्हते. शुक्रवारी (ता. ११) रात्री पुन्हा माघारी यायचे म्हणून ते व मित्र कंपनी जेजुरीला निघाले अन् अपघात झाला.

मदतीचे आवाहन

डावा हात अगोदरच निकामी असल्याने उजवा हात व डावा पाय नीट होण्यासाठी अहिल्यानगरला रुग्णालयात ये-जा करणे, औषधे व इतर खर्चासाठी पत्नी व मुली मोठ्या आशेने याचना करीत आहेत. नातेवाईक एकनाथ नांदे यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले आहे. दानशूर व्यक्ती पुढे आल्या, तर अपंग व्यक्ती पुन्हा पायावर उभा राहू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com