
जामखेड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन जामखेडला अतिशय उत्साहात पार पडला.शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील गणपती मंदिरात आरती करून छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीची सुरुवात ऑपरेशन सिंदूरमधून भारतीय शौर्याला मानवंदना देण्यासाठी ब्रह्मोस मिसाईलची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती. याचे लोकार्पण आजी-माजी सैनिकांच्या हस्ते करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.