भाजपातील वाचाळवीरांना शिवसेनेची ताकद दाखवावीच लागेल

Shivsena member registration in Karjat taluka
Shivsena member registration in Karjat taluka

कर्जत (अहमदनगर) : लोकशाही आहे त्यामुळे आंदोलन कोणीही करावेत, त्यास विरोध नाही. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत. भाजपातील या वाचाळ वीरांना शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागेल व शिवसेनेची ताकद दाखवावीच लागेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या पक्ष बांधणीसह सभासद नोंदणीची तालुक्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. जेष्ठ नेते बळीराम यादव, तालुकाप्रमुख दीपक शहाणे महावीर बोरा, तालुका उपप्रमुख सुभाष जाधव राशीनचे शहर प्रमुख नाझीम काझी, आविनाश जाधव आदीसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. कुळधरण येथील जगदंबा मातेचा आशीर्वाद घेऊन या सभासद नोंदणीला सुरुवात झाली. ते म्हणाले आगामी काळात आपल्याला अधिक सक्षमपणे काम करावे लागेल.

भाजपाचे काही लोक सध्या स्वतः च्या प्रसिध्दीसाठी थेट मुख्यमंत्री यांच्या वर एकेरी भाषेत टीका करत असून ते सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत. यामधून आलेल्या नैरश्या मधून ते शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री यांच्यावर टीका करत आहेत. त्यांना अजूनही राज्यांमध्ये सत्तेवर येण्याचे दिवा स्वप्न पडत आहेत, परंतु हे सरकार पाच वर्षे शिकणार असून पुढील सत्ता देखील शिवसेनेची येणार आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना सध्या काही काम नाही आणि या पुढेही काम राहणार नाही. कारण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील जनता खुश आहे.मात्र त्यांच्यावर होणारी एकेरी टीका कधीही शिवसेना खपवून घेणार नाही.

प्रसंगी शिवसैनिक रस्त्यावर उतरतील तेंव्हा ते समोर कोण आहेत हे पाहणार नाहीत.शिवसेना आणि शिवसैनिक जशास तसे उत्तर कसे देतात याचा विसर भाजपवाल्यांना पडू नये असा इशारा श्री दळवी यांनी यावेळी दिला.दीपक शहाणे म्हणाले तालुक्यात शिवसेनेची ताकद चांगली आहे मात्र शहरात ती अधिक वाढण्यासाठी स्वतंत्र रणनीती तयार करू आगामी नगर पंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्षमपणे काम करावे लागेल या दृष्टीने आपल्या सर्वांची जबाबदारी मोठी आहे. यावेळी सुभाष जाधव यांनी प्रस्ताविक केले.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com