शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतली मंत्री शंकरराव गडाख परीवाराची भेट

विनायक दरंदले
Monday, 9 November 2020

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी (ता. ९) सकाळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील घरी भेट देवून गौरी प्रशांत गडाख यांच्या निधनाबद्दल सांत्वन केले.

सोनई (अहमदनगर) : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी (ता. ९) सकाळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील घरी भेट देवून गौरी प्रशांत गडाख यांच्या निधनाबद्दल सांत्वन केले.

काल रविवारी (ता. ८) यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या पत्नी गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज नार्वेकर सांत्वन भेटीसाठी हेलिकॉप्टरने मुळा पब्लिक स्कुल येथे आले. तेथून ते व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर मोटारीने गडाख वस्तीवर पोचले. यावेळी उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, नगरचे आमदार संग्राम जगताप, आदर्श हिवरेबाजारचे पोपटराव पवार उपस्थित होते.

गडाख यांच्या निवासस्थानी मंत्री शंकरराव गडाख, प्रशांत पाटील गडाख, सेवा संस्थेचे अध्यक्ष विश्वास गडाख यांची भेट घेवून नार्वेकर यांनी सांत्वन केले. झालेली घटना खुपच मनाला धक्का देणारी आहे. या दु: खातून सर्व परीवार लवकर सावरावा, असे त्यांनी सांगितले. ११ वाजता आमदार जगतापसह ते हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Secretary Milind Narvekar meet on Minister Shankarrao Gadakh family