

अहिल्यानगर : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी म्हणून २०१७ साली शिवशाही बससेवा सुरू केली. मात्र आठ वर्षांतच या बसची अवस्था दयनीय झाली आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात ७९२ शिवशाही असून प्रत्यक्षात ५०० बसच रस्त्यावर धावत आहेत.