Ahilyanagar News : आरोपीने उसाच्या शेतामध्ये नेवून, चाकूचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. बळजबरीने शारीररिक अत्याचार केले. यावरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला होता.
Shocking incident from Shevgaon: Father booked for assaulting his daughter under knife threat in a farmland.Sakal
शेवगाव : अल्पवयीन मुलीवर तिच्या पित्याने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शेवगाव तालुक्यात घडली. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला चोवीस तासांच्या आत जेरबंद केले.