
शिर्डी : रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याचे चोरीच्या उद्देशाने अपहरण करून त्याला मारहाण करून गळा आवळून पाठीत चाकूने भोसकून खून करण्यात आला. खून झालेल्या इसमाच्या मोबाईलची चोरून विक्री केली. त्या पैशातून वाढदिवस साजरा करणाऱ्या सात अल्पवयीन मुलांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. खून झाल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी गुन्ह्याची उकल झाली, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.